वेगाचा थरार….

कालच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिमाखात पार पडला. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या व वाढदिवस साजरा केला. खरं तर माझ्या साठी कालच्या दिवसातला एकच क्षण महत्वाचा होता. तो म्हणजे त्यांच्या हस्ते मध्य प्रदेश येथील कुनी अभयारण्याची चित्त्याना ओळख करून देणे……

इयत्ता १ ली मध्ये मांसाहारी प्राणी व शाकाहारी प्राणी यांच्यातील फरक कळला. इ. २ री मध्ये आलो व एक शाकाहारी आणि एक मांसाहारी प्राणी यांच्या वर माहिती लिहायला लावली. घरी येउन आईला प्रकल्प सांगितला व बाबांना घेऊन दुकानात सर्व प्राण्यांचे स्टीकर आणायला गेलो. स्टीकर आणले व प्रकल्प करायला बसलो, शाकाहारी प्राणी ची माहिती लिहिली व त्यानंतर मांसाहारी प्राणी यावर लिहायची वेळ आली. कोणता प्रणी लिहू ते काळात नव्हतं कधी वाघ तर कधी सिंह भारी वाटायचा. शेवटी आई बाबा बोलले कि हे दोन्ही लिहू नको, चित्त्या विषयी लिही.

माझी सुरुवात चित्ता प्राणी काय यापासून मग WIKIPEDIA पासून यु ट्यूब सर्व ठिकाणी माहिती पाहिली. मग काय मी तर जाम डेंजर FAN झालो चित्त्याचा !! त्याच्या अफाट वेगाने तर मला पुरतीच भुरळ पाडली. ताशी १२० किमी पर्यंत वेग !!

चित्त्या विषयी वाचत गेलो आणि माहिती लिहित गेलो. त्या दिवशी मला त्याच एवढ वेड लागल कि मी आई बाबा दोघांना म्हणल कि आपण चित्ता पाहायला जाऊच. पुढचा १ आठवडा झाला मी त्यांना रोज तेच तेच बोलत होतो, सदैव चित्त्याचा जप शेवटी आई म्हणाली कि चित्ता भारतात कुठेच नाही. मी पुरताच हादरलो. असा कसा होईल करत मी भांडत राहिलो. पण तिने मला सांगितला कि तू याविषयी मामासोबत वाद घाल. त्याला या सगळ्याच वेड आणि माहिती दोन्ही आहे.

आईने म्हणाव आणि पुढच्या दिवशी लगेच मामा कडे जायचा योग यावा यासारखं सुख नाही. मी लगेच Bag भरली व पुढच्या दिवशी मामा कडे गेलो. मामा सोबत या विषयावर बोललो. आई चा अंदाज बरोबर निघाला. मामाकडे चित्त्या वर आधारित चित्रपट होता त्याने मला सांगितले कि तो चित्रपट तू पहिले पहा आणि मग परत बोलू आपण. त्याने मला तो चित्रपट लावून दिला व मी तहान भूक विसरून ते पाहत बसलो..

मला तो चित्रपट खूप आवडला. त्यानंतर मामाने मला भारतातील चित्ते नामशेष होण्याची कारणे सांगितली. चित्त्याची शिकार म्हणजे मोठा पराक्रम हे त्या काळच एक सूत्र होत. चित्ता मारण्याचे इनामी ६ ते १२ रुपये मिळायचे. अश्या अनेक कारणांमुळे चित्त्याची तस्करी वाढली. प्राचीन काळातील राजे व ब्रिटीश राजवटीतील बड्या ब्रिटीश अधिकार्यांना हा एक खेळ होता. आपले साहस दाखवण्याचे साधन. या मुळे आशियाई चित्ताची संख्या खालावत गेली. १९५२ साली भारतातील शेवटचे ३ बित्ते मारण्यात आले व चित्ता भारतातून नामशेष झाला.

मी हे ऐकन खूप दुखी झालो मामला विचारल कि अजून कुठेच चित्ते नाही का? तो बोलला कि चित्ते आता फक्त इराण आणि आफ्रिकेमध्ये सापडतात. मी नाराज होतोच. कारण भारतात चित्ते नव्हते. मी थोडा वेळ शांत बसलो. मला एक प्रश्न सुचला व मी तो लगेच माझ्या मामा ला विचारला, मामा मी जर राष्ट्रपतींना सांगितला कि चित्ता आणा तर ते ऐकतील का रे ? मामाने लगेच उत्तर दिले तू पत्र लिही राष्ट्रपतींना आणि ते मी पोस्टात टाकतो, आपण बघू काय होतं ते बाबा पण तेच म्हणाले तू बिन्दास्त लिही आपण बघू काय होईल ते

मग काय मी लगेच पत्र लिहायला घेतल. आमच सगळ घर ते पत्र लिहिण्यात मग्न. शेवटी १ आठवडा नंतर ते पत्र लिहून पूर्ण झाला व मामा, बाबा ने ते पत्र पोस्टात दिल, त्यानंतर ते पत्र वाचला कि नाही याबाबत मला काही कळला नाही आणि मला उत्तर पण आले नाही. पण जवळपास १ महिन्याने पेपर ला चित्ते भारतात परत आणायचं विचार सुरु आहे अशी बातमी आली.

मी आत्ता १२ वी मध्ये शिकत आहे. जेव्हा काल चित्ते भारतात आले त्यावेळी मला परत एकदा या सर्व घटनेची आठवण झाली. आजही चित्ता पाहिला की मला असा वाटत कि आम्ही एकमेकांना आतून जोडलेले आहोत.

खर तर हे असा मी बोलल तर लोक म्हणतील हा वेडा आहे, पण असो.



मी आज भारतीय वायुदलाचा एक ऑफिसर व्हायचे स्वप्न पाहतो आहे. माझ्यातला ऑफिसर चित्या कडून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मला प्रवृत्त करतो. चित्त्याचा वेग जसा आहे तसा वेग माझ्या वागण्यात आणि निर्णय घेण्यात असायला हवा. चित्ता ज्याप्रकारे त्याच्या लक्षाकडे आगेकुच करतो. एकदम शातपणे, ध्येयाला मागोवा न लागू देता, व ध्येय जवळ आले कि सर्व प्रणानिशी त्यावर झडप घालतो. हे सगळ एक ऑफिसर म्हणून माझ्या मध्ये असण महत्वाचे आहे. दुर्दैवाने ते नाहीये, पण सुदैवाने वेळ हातातून गेली नाही. या निमित्ताने पा सर्व गोष्टी शिकण्याचा निर्धार करतो व या गोष्टी माझ्या वागण्यात आणण्याचा प्रयत्न करेन.

चित्ता भारतात आला हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी नक्की चित्ता पाहायला जाईल.

13 thoughts on “वेगाचा थरार….

  1. खूप छान शार्दुल!…
    चित्यासारखंच अचूक लक्ष साधण्याची लक्षवेधी नजर तुला लाभावी,…..चित्याच्या उत्तुंग वेगासारखी तूही तुझ्या वायुदलातील ऑफिसर होण्याच्या ध्येयापर्यंत गरुड झेप घ्यावीस, ही सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा!

    Like

    1. खूप खूप सुंदर लिहिले आहेस शार्दुल. तुझ्या भावना नेमक्या व योग्य शब्दात मांडल्या आहेस. चिताप्रमाणे वेगवान यश तुला मिळो व तू लवकर ऑफिसर होशील हीच सदिच्छा खूप खूप शुभेच्छा.

      Like

  2. मला हे वाचताना तु लहान असतानाचा डोळयासमोर आलास .तुला चित्ता याविषयी किती कुतुहल व जिज्ञासा होती ते ही आठवले . तुला आता चित्ता भारतात आलेल्याचाही आनंद आहे . छानच ..तुला चित्ता पाहण्याचा योग येवो .

    Like

  3. मला हे वाचताना तु लहान असतानाचा डोळयासमोर आलास .तुला चित्ता याविषयी किती कुतुहल व जिज्ञासा होती ते ही आठवले . तुला आता चित्ता भारतात आलेल्याचाही आनंद आहे . छानच ..तुला चित्ता पाहण्याचा योग लवकरच येवो .

    Like

  4. शार्दूल … किती सुंदर लिहिलं आहेस रे ! मी सुद्धा चित्त्याच्या प्रेमात पडले. अत्यंत तरल संवेदनशील मन आणि त्याचबरोबर एकदा ठरवलं की मग टोकाला जाईपर्यंत पाठपुरावा करायची तुझी सवय मला खूप आवडते. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद !! चित्त्यासारखी मोठी झेप नक्की घेशील बाळा तू

    Like

  5. वा .भारी लिहलेले आहेस. 👌👌
    खूप खूप शुभेच्छा तुला

    Like

  6. छान लिहिलंय शार्दूल! चित्याच्या वेगाने तुझी ध्येयपूर्ती होवो ही शुभेच्छा!!

    Like

Leave a reply to शीतल कापशीकर Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started